पुणे : भाजपमध्ये पक्षप्रवेशासाठी मोठी रांग असून, कोणतेही आश्वासन न देता पार्श्वभूमी तपासूनच प्रवेश देण्यात येत आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची इच्छा असल्यास ती पूर्ण होईल. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाने भाजप-शिवसेना युतीला फायदा होण्याच्यादृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, असं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या पक्षप्रवेशाबाबत पाटील यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. पाटील म्हणाले,’लोकांच्या मनात भाजपबाबत विश्वास असल्याने आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मतदारसंघाचा विकास होण्याची खात्री असल्याने पक्षप्रवेश होत आहेत. एक सप्टेंबरला काही पक्षप्रवेश होणार आहेत.
पक्षप्रवेशाची मोठी रांग आहे. मात्र, संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत का, हे पाहिले जाते. तसेच, प्रवेश करणाऱ्यांना कोणतेही आश्वासन देण्यात येत नाही. पक्षप्रवेश करण्यापूर्वी पूर्वीच्या पदाचा त्याग करावा लागतो, ही प्रक्रिया वेळखाऊ आहे.’
उदयनराजे भोसले यांची पंतप्रधानांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्याची इच्छा असल्याबाबत विचारणा करण्यात आली असता, ते राजे असल्याने त्यांची अशी इच्छा असल्यास ती अवश्य पूर्ण होईल, असं चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिले.
नारायण राणेंच्या पक्षप्रवेशाने युतीला फायदा होईल, त्यादृष्टीने शहा आणि फडणवीस हे निर्णय घेतील, असंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
‘एनआरसी’ची अंतिम यादी जाहीर; आसामाच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं न घाबरण्याचं आवाहन – https://t.co/DgOZyfDYcO @Sarwanand_Sonwal
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 31, 2019
“‘अच्छे दिन’चा नारा देणाऱ्या सरकारने अर्थव्यवस्था पंक्चर केली” – https://t.co/1M7CfdJkoU @priyankagandhi @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 31, 2019
“‘अच्छे दिन’चा नारा देणाऱ्या सरकारने अर्थव्यवस्था पंक्चर केली” – https://t.co/1M7CfdJkoU @priyankagandhi @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 31, 2019