पुणे महाराष्ट्र

खासदार उदयनराजे भोसले करणार मराठा आंदोलनाचं नेतृत्व

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले आता मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. राज्यभरातील मराठा संघटनांनी केलेली विनंती उदयनराजे यांनी मान्य केली आहे. 

पुण्यात आज काही मराठा संघटनांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. मराठा क्रांती मोर्चाला नेतृत्व नाही, आपण हे नेतृत्व स्वीकारावं, विनंती या संघटनांच्या प्रतिनिधींनी उदयनराजेंकडे केली होती. उदयनराजेंनी ती विनंती मान्य केली आहे. 

उदयनराजे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत जाऊन भेट घेणार होते. मात्र आता त्यांनी आपला कार्यक्रम बदलला आहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्या इतर नेत्यांशी उदयनराजे स्वतः बोलणार आहे. त्यानंतर उदयनराजे मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं कळतंय.

मराठा आरक्षणाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून ठोस भूमिका मिळेपर्यंत मी मागे हटणार नाही- उदयनराजे भोसले, खासदार

IMPIMP