…म्हणून राष्ट्रवादीचे खासदार उदनराजे भोसले शरद पवारांची भेट घेणार!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यांनीही याबाबत निर्णय घेऊ, असे म्हणत आपल्या राजकीय वाटचालीचे संकेत दिले. यानंतर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसह अनेकांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आज अखेर उदयनराजे आणि शरद पवार यांची भेट होत आहे. त्यामुळे आता या भेटीत काय चर्चा होणार? याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे.

उदयनराजे सकाळी 10 वाजता पुण्यातील मोतीबाग येथील शरद पवारांच्या घरी त्यांची भेट घेतील. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत.

मागील अनेक दिवसांपासून उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीनंतर उदयनराजेंचं मनपरिवर्तन होणार की ते भाजप प्रवेशाचा निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

उदयनराजेंनी पक्ष सोडू नये यासाठी राष्ट्रवादीकडूनही जोरदार प्रयत्न सुरु आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना उदयनराजे जाणं हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का आहे. फक्त साताऱ्यातच नव्हे, तर राज्यभरात उदयनराजेंचा स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रवादीला फायदा होईल. यासाठी राष्ट्रवादी विविध माध्यमातून उदयनराजेंची मनधरणी करत आहे. 

महत्वाच्या बातम्या-