कॉलर माझी आहे, मी चावीन नाहीतर फाडून टाकेन- उदयनराजे भोसले

मुंबई | कॉलर उडवणं ही माझी स्टाईल आहे. कॉलर माझी आहे. मी ती चावीन नाहीतर फाडून टाकेन. दुसऱ्यांना काय करायचं?, असं उदयनराजे भोेसलेंनी म्हटलं आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा झाली त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

उदयनराजे त्यांच्या  कॉलर उडवण्याच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या स्टाईलवर अनेकदा टीकाही होते. टीकाकारांना उत्तर देताना त्यांनी माझी कॉलर आहे, मी काहीही करेन दुसऱ्यांना त्याच्याशी काय करायचंय? असा प्रश्न त्यांनी विचारला.

कशावरही चर्चा होते. मुद्द्यांचं राजकारण करु नका, तर समाजकारण करा. लोकं आशिर्वाद देतील, असंही उदयनराजे म्हणाले.

राष्ट्रवादीत असतानाही उदयनराजे पक्षाध्यक्ष शरद पवारांसमोर कॉलर उडवताना दिसायचे. भाजपप्रवेशानंतर महाजनादेश यात्रेदरम्यानही त्यांनी कॉलर उडवली होती.

दरम्यान, शरद पवार मला वडिलांच्या स्थानी आहेत. ते जर साताऱ्यात उभे राहिले तर मी निवडणुकीत उभा राहणार नाही, असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-