माझ्यावर प्रेम करणारी इतकी ‘येडी’ असताना मला ‘ईडी’ची भिती कशाला- उदयनराजे भोसले

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या हटके शैलीसाठी ओळखले जातात. सध्या महाराष्ट्रात पक्षांतराने वेग पकडला आहे. उदयनराजेही भाजप प्रवेशाच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. ‘सत्ताधारी भाजप ‘ईडी’ची भीती दाखवून विरोधातील नेत्यांना आपल्या पक्षात घेत आहे,’ असा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.

‘तुम्हालाही ईडीची भीती दाखवून भाजपमध्ये जाण्यास भाग पाडण्यात येत आहे का,’ असा प्रश्न उदयनराजेंनाही विचारण्यात आला. यावर उदयनराजेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत जोरदार फटकेबाजी केली आहे. ‘माझ्यावर प्रेम करणारी इतकी येडी असताना मला ईडीची भीती कशी वाटेल,’ अशी मिश्कील प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली आहे.

राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावरून गेल्या काही दिवसांत अनेक घडामोडी घडत आहेत. उदयनराजे भाजपमध्ये दाखल होणार की राष्ट्रवादीतच राहणार, याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे. त्यामुळे आपल्या बेधडक स्वभावासाठी परिचित असणारे उदयनराजे आपल्या राजकीय वाटचालीबाबत सावध पाऊलं का टाकत आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

उदयनराजे भोसले यांनी पक्ष सोडणं राष्ट्रवादीसाठी अडचणीचं ठरू शकतं. कारण सातारा लोकसभा मतदारसंघातील उदयनराजेंच्या पाठीमागे असणारा मोठा मतदार राष्ट्रवादीपासून दूर जाईलच, शिवाय महाराष्ट्रभर उदयनराजेंना मानणारा जो मोठा वर्ग आहे तो देखील दुरावण्याची राष्ट्रवादीला भीती आहे. त्यामुळेच आधी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी आणि नंतर खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

महत्वाच्या बातम्या-