‘जे धमकी देतील त्यांनी माझ्याकडे या’, उदयनराजे कडाडले

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे व शिंदे गटातील आमदारांची नाराजी दुर करण्यासाठी शिवसेनेकडून अनेक प्रयत्न झालेले पाहायला मिळाले.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्याकडून अनेक प्रयत्न करूनही शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांची संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे.

संजय राऊत तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोर आमदारांना थेट आव्हान दिल्यानंतर शिवसेना विरूद्ध शिंदेसेना वाद अधिकच पेटला. या राजकीय घडामोडींवरून उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मला कुणाचं नाव घेऊन मोठं करायचं नाही. बेताल वक्तव्य करणारे कोण हे सगळ्यांना माहिती आहे, असा टोला उदयनराजेंनी लगावला आहे.

हे सरकार पडणार आहे. हा आकड्यांचा खेळ आहे. ज्यांच्याकडे बहुमत ते सरकारमध्ये राहतील, असं वक्तव्य उदयनराजेंनी केलं आहे.

धमकीला कुणी घाबरत नाही. जे धमकी देतील त्यांनी माझ्याकडे यावं मी पाहतो, असा इशारा उदयनराजेंनी दिला आहे.

दरम्यान, केवळ सत्तास्थापनेसाठी ही आघाडी झाली आहे. ही आघाडी फारकाळ टिकणार नाही, असा विश्वास देखील उदयनराजेंनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘तुम्ही फक्त त्यांचे बोर्ड लावा, सतरंज्या झटका आणि मरा’, इंदुरीकर महाराजांचं परखड मत

मोठी बातमी! शिवसेना नेते अर्जुन खोतकरांवर ईडीची कारवाई

सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय! गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लिन चीट

‘स्वत:चा मुलगा खासदार आहे त्याचं काय’, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

“बंडखोर आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवा, आम्ही योग्य तो पाहुणचार करू”