मुंबई | नुसत्या उद्धव ठाकरेला दीड दमडीची किंमत नाही. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावासमोर समोरचा माणून आदराने उभा राहतो. मी मुख्यमंत्री असलो काय नसलो काय मला फरक पडत नाही. कारण माझं जे नाव आहे ते बस आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
उद्या निवडणूक आहे. पण मी त्याचा विचार करत नाही..राज्यसभेत आमच्या एकाही सहकाऱ्याचं मत फुटलं नाही.कुणाचं फुटलं ते देखील समजलं आहे.पण उद्याच्या राजकारणात ते उद्या कुणीच फुटणार नाही हे नक्की.एकदा बाळासाहेब म्हणाले होते की मला आईचं दूध विकणारा नराधम माझ्या शिवसेनेत नको, तसं मलाही नको, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय.
सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांना मी विधानपरिषदेची उमेदवारी दिली नाही. पण तरीही ते आजही त्याच उमेदीने काम करत आहेत. शिवसेना प्रमुखांनी जेव्हा जेव्हा त्यांना जबाबादारी दिली. तेव्हाही त्यांनी नेहमी ती जबाबदारी चोखपणे पार पडली, असं त्यांनी सांगितलं.
आज शिवसेना 56 वर्ष पूर्ण करते आहे. उद्या निवडणूक आहे. आमदारांना हॉटेलमध्ये ठेवावं लागतंय. आपलेच आमदार, नगरसेवक यांना एकत्र ठेवणं ही आजची लोकशाही आहे, असं ते म्हणाले.
मला हे जे आजचं चित्र आहे. ते मला अजून चांगलं दिसलं पाहिजे.आज जे समोर दिसतंय त्याच संख्येने मला आपले आमदार पुढच्यावेळी दिसले पाहिजे, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पक्षादेश पाळणं आमच्या रक्तातच’; आजारी असतानाही मुक्ता टिळक मतदान करण्यासाठी मुंबईकडे रवाना
“तोडफोडीमध्ये सहभागी झालेल्यांना सैन्य दलात घेणार नाही”
“काही खोटारडी लोकं मनाला वाटेल तसं बोलत असतात”
“आज तीच शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचली आहे”
“पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची सशक्ततेच्या दिशेने वाटचाल”