“एक गट अन् बारा भानगडी”; उद्धव ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका, म्हणाले…

मुंबई | शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका केली आहे. राज्यात सध्या एक गट आणि बारा भानगडींचा मॅटिनी शो सुरु असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

राज्याच्या नशिबात जे भोग आले आहेत, त्यातून मार्ग कसा काढायचा या विवंचनेत सध्या महाराष्ट्रातील मराठी जनता असल्याचे शिवसेनेने म्हंटले आहे. ईडी-पिडा बळाचा वापर करुन राज्याच्या मानगुटीवर चाळीस पिंपळांचे मुंजे बसविले आहेत, असे शिवसेना म्हणत आहे.

रोज सकाळी उठून पाहिले की, राज्यात रोज एक नवी भानगड दिसते आहे. या भानगडींचा आणि शिवसेेनेचा काहीही संबंध नाही, असे सामनातून म्हंटले आहे. 38 दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तारले. खाते वाटप देखील रडत रडत झाले, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

नगरविकासाचे मलाईदार खाते सोडले, तर भाजपने शिंदे गटाच्या हातात भोपळा दिला आहे. संपूर्ण महत्वाची आणि प्रमुख खाती ही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्वत: जवळ ठेवली आहेत.

तसेच नाक मुठीत धरुन या 50 आमदारांना देवेंद्र फडणवीसांकडे जावे लागेल. 50 खोक्यांखाली यांचा स्वाभिमान चिरडून गेला असल्याने ही मानहानी ते निमुटपणे सहन करतील, असे ठाकरे म्हणाले.

शिवसैनिक स्वाभिमानाची मीठ भाकरी खातो. पण महाराष्ट्रासोबत बईमानी करणार नाही. भाजपला मुंबई महानगरपालिकेवरील भगवा उतरावयाचा आहे. मराठी माणसाला गुलाम आणि लाचार करुन मुंबई गिळंकृत करायची आहे, असा आरोप देखील सामनातून करण्यात आला.

प्रति शिवसेना भवनावरुन देखील शिवसेनेने शिंदे गटाला सुनावले. शिवसेना भवन हा शिवरायांच्या विचारांचा वारसा चालण्यासाठी बांधलेला अभेद किल्ला आहे. त्यामुळे बारा भानगडी करुन आलेल्यांना तसे करणे परवडणार नाही आणि त्यांना हे झेपणार नाही, असे देखील आजच्या सामनातून म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

मेटे यांचा मृत्यू संशयास्पद; त्यांच्या पत्नीचा दावा, म्हणाल्या …

स्वतंत्र्यदिनी सावरकर आणि टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन वाद, वाचा सविस्तर बातमी…

“स्वतंत्र्य भारतात जन्माला आलेला मी पहिला…” – नरेंद्र मोदी

पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहन संपन्न

शिवसेनाभवन बांधण्यावरुन शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा दणका