“माझे 170 मोहरे फोडून दाखवाच, मला सोडून ते तुमची गुलामगिरी पत्कारणार नाही”

मुंबई | आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधल्याचं पहायला मिळालं. येत्या 7 तारखेला आघाडी सरकार पडणार असल्याची भविष्यवाणी चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

चंद्रकांत पाटील यांच्या भविष्यवणी सध्या अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजले. ते पिल्लू वळवळ करत होतं. आता आमच्यावरच फुत्कारात आहे, अशा खोचक शब्दांत उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

आज इकडे धाड पाडतायेत तिकडे धाड पाडतायेत, याला अटक करतायेत, त्याला अटक करतायेत. मात्र आता हे खपवून घ्यायचं नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकार पडणार, सरकार पडणार, माझे 170 मोहरे फोडून दाखवाच. मला सोडून ते तुमची गुलामगिरी पत्कारणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

राजकीय वर्तुळात आता राजकीय भुकंप येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आता जोरदार शाब्दिक चकमक पहायला मिळणार आहे.

भाजपनं सध्या राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार काय निर्णय घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक सज्ज

  “सरकार पडणार, सरकार पडणार, माझे 170 मोहरे फोडून दाखवाच”

  आनंदाची बातमी! महाराष्ट्रात आज कोरोनानं एकाचाही मृत्यू नाही 

 मोठी बातमी! रशियन सैनिकांनी युक्रेनच्या दोन मोठ्या शहरांवर मिळवला ताबा

 “युक्रेनी सैन्याने भारतीयांना उठा-बशा काढायला लावल्या”, विद्यार्थीनीचा गंभीर आरोप