मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विकारल्यापासून निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. त्यांनी आज नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनामधील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.
आरेच्या आंदोलकांचे गुन्हे मागे घेतल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून नाणारमधील गुन्हे देखील मागे घेण्याची मागणी केली होती. उद्धव ठाकरेंनी ही मागणी मान्य केली आहे.
आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेतले. आता नाणार आंदोलनातील गुन्हे देखील मागे घ्यावेत. ते ही पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठीच लढत होते, असं नितेश राणेंनी म्हटलं होतं.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रोच्या आरे जंगलातील कारशेडला स्थगिती दिली. तसेच त्याचा संपूर्ण आढावा घेण्याचे आदेश दिले.
महत्वाच्या बातम्या-
अजित पवार भाजपसोबत का गेले होते?; शरद पवारांचा खुलासा – https://t.co/AjH4W9Okwn @PawarSpeaks @AjitPawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
गोपीनाथ मुंडे साहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल; उद्धव ठाकरेंचा पंकजांना रिप्लाय – https://t.co/YDdYpKz8nN @OfficeofUT @Pankajamunde
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
…म्हणून सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार झाल्या; शरद पवारांनी केला खुलासा – https://t.co/4SjTUjI8i1 @PawarSpeaks @INCIndia
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019