“उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संभाजीराजेंची व्यवस्थितरित्या कोंडी केली”

मुंबई | राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा संभाजीराजे छत्रपतींनी केली होती.

तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा आणि उद्या तुमची उमेदवारी जाहीर करतो. पण मी सरळ सांगितलं की, मी निवडणूक अपक्ष लढणार आहे, असं संभाजीराजेंनी म्हटलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नंतर माझा फोन उचलला नसल्याचा गंभीर आरोप संभाजीराजेंनी केला आहे. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून संभाजीराजे छत्रपतींची व्यवस्थितरित्या कोंडी करण्यात आली असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

संभाजीराजेंना काही अटी शर्थी टाकल्या गेल्या. पण संभाजीराजेंनी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की कोणत्याही पक्षात न जाता मी अपक्ष लढणार आहे, असंही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की,  शिवबंधन बांधण्याच्या बातम्या सोडल्या आणि वेळेला त्यांचा फोन उचलला नाही. माझ्याप्रमाणेच त्यांचाही फोन उचलला गेला नाही. म्हणजेच ठरवून त्यांची कोंडी केली गेली ज्यामुळे त्यांना राज्यसभेच्या रिंगणातून माघार घ्यावी लागली.

पवारसाहेबांना नीट माहिती होतं, यावेळची जागा आपल्याकडे नाही. ही जागा शिवसेनेकडे आहे. पण तरीही त्यांनी आपला पाठिंबा असल्याचं आणि उरलेली मतं राजेंना देण्याची घोषणा केली.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे.

मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून, स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या – 

  Monsoon Update| हवामान खात्यानं दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

  …म्हणून शरद पवारांनी बाहेरुनच घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन

  कोरोनाविषयी मुख्यमंत्र्यांचं सूचक आवाहन, म्हणाले…

  मोठी बातमी ! केंद्रीय मंत्री नारायण राणे रुग्णालयात दाखल

  Gold Rate | सोने-चांदीच्या दरात वाढ, वाचा ताजे दर