मुंबई | भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस मवाळ भूमिका घेत असल्याने उद्धव ठाकरे नाराज आहेत. त्यांनी आपली ही नाराजी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली आहे.
शिवसेना भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना राष्ट्रवादी मात्र मवाळ भूमिका घेत असल्याचं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना सांगितलं आहे.
फक्त आम्हीच लढा देत आहोत. फक्त शिवसेनाच नाही तर राष्ट्रवादीच्या वतीनेही आम्हीच लढत आहोत. शिवसैनिक फ्रंटफूटवर जाऊन लढत असताना राष्ट्रवादी मात्र बॅकफूटवर दिसत आहे. ज्याप्रमाणे त्यांना भाजपविरोधात भूमिका घेतली पाहिजे तशी घेताना ते दिसत नाहीत, असं शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितल्याची माहिती आहे.
शिवसेना नेत्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कसे वारंवार महाविकास आघाडीने सुडाच्या राजकारण्यात न पडता कशा पद्दतीने फक्त राज्यातील विकासकामांकडे लक्ष द्यावं यावर भर देत असल्याकडेही लक्ष वेधलं.
शिवसेनेला भाजप आणि केंद्रीय यंत्रणांचा सामना करण्यासाठी पोलीस आपल्या बाजूला हवे आहेत आणि तिथेच मुळात हा वाद सुरु आहे. कारण गृहखातं राष्ट्रवादीकडे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर इंडियन एक्स्पेसशी बोलताना सांगितलं की, आम्ही भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना काही शिवसेना नेत्यांना आमच्याकडे गृहखातं असल्याने अजून आक्रमक भूमिका घ्यावी असं वाटत आहे, असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
Sharad Pawar | “शरद पवार एक भीष्म पितामह आहेत”
“ईडीचा वापर पाळलेल्या गुंडासारखा जर कोणी करत असेल तर…”
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय!
दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा
‘काहीही खाऊ नका, पिऊ नका’; झेलेंस्की यांनी अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना