मुंबई | औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील स्थलांतरित मजूर, कामगारांना स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका असं भावनिक आवाहन केलं आहे. या कामगारांनी धीर सोडू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल, तोपर्यंत आपण धीर धरा. आपल्या सगळ्यांची व्यवस्था केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
गेल्या ४-५ दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागातून विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहे. त्यातून सुमारे एक लाख लोक आपापल्या गावी सुखरूप पोहचले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत राज्यत अडकलेले सर्व श्रमिक व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या घरी पोहचतील असे नियोजन झाले असून रेल्वेशी सातत्याने समन्वय सुरु आहे. नुकतीच मुंबईहून रेल्वे सोडण्याचा निर्णयही झाला असून त्यामुळेही अनेक मजूर घरी परततील. मात्र जीवावर उदार होऊन, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
दरम्यान, औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील 16 मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे तसेच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-देशातल्या मुस्लिमांना दुय्यम नागरिक ठरवता येणार नाही- संजय राऊत
-CBSE बोर्डाच्या 10 वी 12 वीच्या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होणार- रमेश पोखरियाल
-मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली!
-‘यंदा फीवाढ करु नका’; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे शिक्षण संस्थांना आदेश
-“दादांनी प्राॅमिस मोडलं”, मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात आलं पाणी