मला सरकारची चिंता नाही… सरकार कुणी पाडू शकत नाही- उद्धव ठाकरे

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनलॉक 1 च्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या संबोधनात विरोधी पक्षावर जोरदार प्रहार केले. मला सरकारची चिंता नाही… सरकार कुणी पाडू शकत नाही, असं सणसणीत प्रत्युत्तर त्यांनी विरोधी पक्षाला दिला.

गेले अनेक दिवस महाराष्ट्रातली कोरोना परिस्थिती अतिषय चिंतेची आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असं भाजप नेते म्हणत आहेत. याच पार्श्वभूमीवर जवळपास 28 हजार रुग्ण कोरोनामुक्त झालेत, तसंच आणखीही कोरोनमुक्त होण्याचं रूग्णाचं प्रमाण वाढतं आहे. मात्र महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान पाहून मला दु:ख होतं, अशा शब्दात त्यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधत आपली नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राला बदनाम करण्याच कारस्थान सुरू आहे.  महाराष्ट्रात भयावह स्थिती नाहीये.  दुर्दैवानं आपलीच लोकं कारस्थान करतात, असा टोमणा त्यांनी विरोधी पक्षाला मारला.

उद्धव ठाकरेंनी आजच्या संबोधनात ‘मिशन बिगीन अगेन म्हणजे पुनश्च हरीओम’ नारा दिला. तसंच इतर देशांनी कश्या प्रकारे लॉकडाऊन उठवलं ते मी पाहिलं. ते पाहूनच मी निर्णय घेतो आहे. हळूहळू लॉकडाऊन शिथिल करतोय. 3 जूनपासून हातपाय हलवायला सुरूवात करू, असं ते म्हणाले.

महाराष्ट्र किती शिस्तबद्ध आहे, याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. 2 महिने आपण खूप संयम पाळला आहे. असाच संयम पाळा. लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणल्याने फक्त गर्दी करू नका, झुंबड उडवू नका, असं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-फक्त ‘या’ एका कारणामुळे अक्षय बोऱ्हाडे-सत्यशील शेरकर यांच्यातील वाद मिटला

-अखेर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द; असे दिले जाणार मार्क

-“पाच वर्षे खिशात राजीनामे असताना सरकार तरलं, मग आताच कसं पडेल?”

-‘…म्हणून शिवसेना आज भाजपसोबत नाही’; संजय राऊत यांनी सांगितलं खरं कारण

-वाढदिवसानिमित्त रूपाली चाकणकरांचं कार्यकर्त्यांना विशेष आवाहन