अयोध्या | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. मी ज्यावेळी अयोध्येत येतो त्यावेळी काहीतरी यश घेऊन येतो आणि रामलल्लाचे आशीर्वाद घेतो. मी राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेच्या वतीने रूपये 1 कोटी देण्याचं जाहीर करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री होईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं परंतू नोव्हेंबरमध्ये अयोध्येला आलो आणि नोव्हेंबरमध्येच मुख्यमंत्री झालो. माझ्यावर ही रामाची कृपा आहे. मी यााधीही अयोध्येला आलो आहे. आताही आलोय आणि यापुढेही नियमित येत राहिल, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
महाराष्ट्रातील राम भक्तांसाठी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याचा मानस असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवलं. तसंच शरयू नदीवर मी मागच्या वेळी आरती केली होती. ती माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती मात्र यावेळी मला आरती करता येणार नाही. कारण कोरोना व्हायरसाच्या प्रभावामुळे मी तो निर्णय घेतला असल्याचं उद्धव म्हणाले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर देण्याचं उद्धव ठाकरेंनी टाळलं आहे. मला त्यावर काही बोलायचं नाही, असं ते म्हणाले. आमची छाती जरी फाडली तरी त्यामध्ये राम दिसेल पण शिवसेनेला रामाचं आणि त्यांचं नातं दाखवावं लागतं, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-आमची छाती जरी फाडली तरी रामच दिसेल- चंद्रकांत पाटील
-राज्यसभेसाठी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चुरस
-काय आश्चर्य ना… येस बँकेवर निर्बंध येण्या आधी गुजरातच्या बँकेने काढून घेतले 265 कोटी
-“भारतात मुस्लिमांच्या जीवाला धोका”
-…म्हणून आम्ही बाबरी पाडल्याची जबाबदारी घेतली; संजय राऊतांचा खुलासा