केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना मोकळ्या मनानं मदत करावी- उद्धव ठाकरे

मुंबई | केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मोकळ्या मनाने मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते आज विधिमंडळातील पत्रकार कक्षात बोलत होते. या

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मदत दिली पाहिजे. केंद्राने आकसाने वागू नये अशी अपेक्षा आहे. लवकरच मी आणि माझं शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला नवी दिल्लीत जाणार आहे, अशी माहिती ठाकरे यांनी दिली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं मदत करायला हवी. विरोधी पक्षातील नेत्यांनीही यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात दोन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 25 हजार रूपये मदत देण्याची मागणी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-