एनआरसी देशात लागू करायची यांच्यात हिम्मत नाही- उद्धव ठाकरे

मुंबई | एनआरसी देशात लागू करायची यांच्यात हिम्मत नाही. त्यांना फक्त असं दाखवायचंय की आम्ही घुसखोरांना काढू इच्छितो पण हे आम्हाला काढू देत नाहीत. म्हणजे ते देशद्रोही आहेत असं म्हटलं की त्यांच काम झालं, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

एनआरसीचा अर्थ हळूहळू लोकांना कळायला लागला आहे. तसेच इतर राज्यांप्रमाणे सीएएविरोधात ठराव करण्याची गरज नाही. कारण त्यामुळे देशातून कोणालाही बाहेर काढलं जाणार नाही. यासंदर्भात येणाऱ्या लोकांच्या घरांचा प्रश्न केंद्रानं सोडवला पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

जिथे भाजपची सत्ता नाही तिथे अस्थिरता निर्माण करायची, दंगे घडवायचे आणि राज्य उलथून टाकायचं याला हे लोक हिंदुत्व म्हणतात का?, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, हिंदुत्वाविषयी गैरसमज पसरवून किंवा दुरूपयोग करून सत्ता मिळवणं हे माझं हिंदुत्व नाही, असा टोला  उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-पवारांना हिंदूविरोधी म्हणनाऱ्यांना आव्हाडांनी धरलं धारेवर

-ओवैसीसुद्धा एक दिवस हनुमान चालिसा म्हणताना दिसतील- योगी आदित्यनाथ

-“देशाला आज गांधीजींसारख्या नेत्याची गरज भासतीय”

-पवार साहेब अजूनही तरूण आहेत, 2024 ला साहेब पंतप्रधान पदावर दिसतील- रोहित पवार

-शरद पवारांकडे सरकारचा रिमोट कंट्रोल नाही तर ते सरकारचे मार्गदर्शक आहेत- मुख्यमंत्री