महाराष्ट्र मुंबई

“…तर अजित पवारांनी भाजपमध्ये प्रवेश करायला पाहिजे होता”

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून भाजप-सेनेत आयारामांची संख्या वाढली आहे. त्यावरुनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘सामना’च्या माध्यमातून विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली आहे.

गंभीर गुन्हे व चौकशांची तलवार डोक्यावर असलेले लोक काँग्रेस पक्षात होते आणि तेच भीतीपोटी पक्षांतर करीत आहेत. मात्र असा दबाव खरोखरच असता तर अजित पवार यांनी भाजपमध्ये सगळ्यात पहिला प्रवेश करायला हवा होता, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. 

इन्कम टॅक्स, ईडीसारख्या एजन्सीचा वापर करुन भाजप-सेना आमदार फोडले आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे.

पूर्वी दसरा-दिवाळीत रवा, साखर, तेलासाठी रेशनिंगच्या दुकानाबाहेर रांगा लागायच्या आता तशा रांगा भाजप-शिवसेनेच्या  बाहेर लागल्या आहेत. मात्र रेेशनिंग दुकानात होतो तसा काळाबाजार इथं होत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

राजकारणात तोडा, फोडा आणि राज्य करा, असा ब्रिटीश नितीचा अवलंब जिल्हा परिषद ते लोकसभा विधानसभापर्यंत फक्त काँग्रेसनेच केला आहे, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे.

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे राज्य पुन्हा यावे अशी श्रींचीच इच्छा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी युतीबाबत सूचक इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेस राष्ट्रवादीचे 50 आमदार भाजपच्या संपर्कात; गिरीश महाजन यांचा मोठा गौप्यस्फोट

“तुमच्या नेत्यांना पक्षात का राहू वाटत नाही त्याचं आत्मचिंतन करा”

-महाराष्ट्र लुटणाऱ्या त्या 250 घराण्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही- चंद्रकांत पाटील

-‘बाजी पलटने में देर नही लगती…’; धनंजय मुंडे यांचा भाजपवर हल्लाबोल

-“शरद पवारांच्या बाजूने एकतरी माणूस शिल्लक राहतो का बघा”

IMPIMP