‘गेले ते बंडखोर नाही तर हरामखोर’, उद्धव ठाकरे बंडखोरांवर बरसले

मुंबई | राज्यात सत्तापलाट तर झालं पण नवं सरकार येऊन अनेक दिवस उलटले तरी मंत्रिमंडळ विस्तार काही झाला नाही. यावरून सर्वच विरोधी पक्षांनी भाजपच्या समर्थनाने आलेल्या या शिंदे सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या सरकारला धक्का देत एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली व भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केलं. या बंडखोरीनंतर एके काळचे जवळचे सहकारीच वैरी झाले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील धुसफूस वाढतच आहे. उद्धव ठाकरेंनी हरामखोर म्हणत पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर हल्ला चढवला आहे.

गेले ते बंडखोर नाही तर हरामखोर आहेत. हिंमत असेल तर शिवसेना प्रमुखांचा, माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. तुमच्या हिंमतीवर मतं मिळवा, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे.

जे फुटून गेले सुदैवाने ज्यांचे आईवडील सोबत आहेत त्यांनी त्यांना घेऊन सभा घ्याव्या आणि मतं मागावीत. प्रत्येकाला आई-वडील प्यारे असतात, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना सुनावलं आहे.

सामान्यांना असामान्य केलं होतं पण ते निघून गेले. आता आपल्याला सामन्यातून असामान्य लोक घडवायचे आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. अरविंद सावंत यांच्या नुतनीकरण झालेल्या शाखेच्या उद्घाटनावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

दरम्यान, ज्या वेळी संकटं आली त्या संकटांना मातीत गाडून शिवसेना पुन्हा उभी राहिली. असा इशारा देताना उद्धव ठाकरेंनी पुढील महिन्यात महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं देखील जाहीर केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

‘मनसे म्हणजे एक आमदाराची अगरबत्ती’, भोगामंत्री म्हणत दीपाली सय्यद यांनी पुन्हा मनसेला डिवचलं

“राऊतांना आता तरी समज आली पाहिजे, त्यांनी पक्षाची काय अवस्था करून टाकलीये”

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंची पूनम पांडेकडून प्रशंसा, म्हणाली…

“शिवसेनेचा लाऊडस्पीकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही”

‘शिवसेना फुटल्याचं श्रेय उद्धव ठाकरेंचच फडणवीसांनी फुकटचं श्रेय घेऊ नये’, राज ठाकरेंची टोलेबाजी