मुंबई : विधानसेभेचे अधिवेशन सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळात बोलत असताना तुफान फटकेबाजी केली आहे. मी इथे येईन असं म्हणालो नव्हतो तरी इथे आलो..मी भाग्यवान आहे, असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीसांना टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीसांकडून आम्ही पाच वर्षे खूप काही शिकलो आहोत. तुम्ही मित्र होतात हे मी लपवलं नाही, पुढेही राहणार आहात. पण आमचं हिंदुत्व तुमच्यापेक्षा वेगळं आहे. दिलेला शब्द पाळणे हे आमचं हिंदुत्व आहे, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.
गेल्या पाच वर्षात सरकारला कधी धोका दिला नाही. काही कट कारस्थान करायची नाही, काळोखात काही करायचं नाही हे पाळलं आहे. तुम्ही बरोबर नीट असता तर हे झालं नसतं, मी घरी बसून हे सगळं टीव्हीवर पाहिलं असतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आवश्यक आहे. मात्र, मला सातबारा नुसता कोरा करायचा नाही तर शेतकऱ्यांना चिंतामुक्त करायचं आहे, असं ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रत्येक वाक्याला अध्यक्ष महोदय म्हणायलाच हवं का?; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला – https://t.co/GIw10LuLaf @OfficeofUT @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
नाना पटोलेंना कृषिमंत्री पद मिळेल अशी अपेक्षा होती मात्र… – देवेंद्र फडणवीस- https://t.co/7kaM1tFJa4 @nanapatole @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
“महाराष्ट्राला पहिल्यांदा काळ्या केसाचा अध्यक्ष लाभला” – https://t.co/vaCtJL8yNO @Awhadspeaks @NANA_PATOLE
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019