महाराष्ट्र मुंबई

कर’नाटकावर’ उद्धव ठाकरेंचा सामनातून हल्लाबोल; म्हणतात…

मुंबई : कर्नाटकच्या काँग्रेस-जेडीएसच्या 16 आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे एच. डी. कुमारस्वामींचं सरकार आणखी निश्चित झालेलं नाही. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून कर्नाटकच्या राजकारणावर टीका करण्यात आली आहे. 

कर्नाटकमधील सध्याचा राजकीय तिढा आता एवढा क्लिष्ट झाला आहे की, तो कमी वेळेत सोडवता येईल याबाबत कायदा वर्तुळात शंका आहे. काँग्रेसनेदेखील पुर्नविचार करुन आणखी एक तगडे या त्रांगड्यात अडकवले आहे. लोकशाहीचे असे धिंडवडे कर्नाटकात सगळेच काढत आहेत, अशी टीका ‘सामना’मधून करण्यात आली आहे. 

दोन्ही बाजूंचा हा तमाशा केंद्र सरकारही शांतपणे का पाहत आहे? एकतर तिथं राष्ट्रपती राजवट लागू करा नाही तर मग कर्नाटक विधानसभाच बरखास्त करा, असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. 

कर्नाटकच्या जनतेला उद्य काय तो निर्णय घेऊ द्या. काहीही करा पण हे कर्नाटकी नाटक एकदाचं बंद करा, असंही सामनामध्ये म्हटलं आहे. 

कर्नाटकच्या राजकीय तमाशाचा प्रश्न आज तरी सुटायला हवा होता. बहुमताचा निर्णय संसदेच्या किंवा विधानसभेच्या सभागृहात व्हायला हवा. पण कुमारस्वामी बहुमत गमावूनही विधानसभेत चर्चेला वेळ वाया घालवत आहेत, असंही सामनामध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“भाजपचा सत्तेचा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही”

-काँग्रेसला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश???

-जोर का झटका जरा धीरेसे देऊ; भाजपचे मंत्री आणि आमदार आमच्या संपर्कात- नाना पटोले

-आमदार फोडण्यासाठी भाजप लालच दाखवतं; ममता बँनर्जींचा आरोप

“आम्ही गटारं अन् शौचालयं साफ करायला खासदार झालो नाही”

IMPIMP