मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून नोटबंदी निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘लोकसभा सचिवालयाच्या अंतर्गत ‘नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर’ संस्थेनं नोटाबंदीनंतरच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे. नोटाबंदीनंतर देशातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याची कबुली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे, असं ‘सामना’मध्ये म्हटलं आहे.
अर्थमंत्र्यांनी अत्यंत धाडसानं सत्य सांगितलं. सरकार अधिकारावर येताच एक एक घुसखोर पकडून बाहेर काढू या घोषणेप्रमाणेच भ्रष्टाचार निर्मूलनाच्या घोषणेचे काय झाले? विकासाचे स्वप्न कसे खोटे आहे ते परवा बिहारात दिसले. देशाच्या अर्थव्यवस्थेचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरू आहेत काय? ते लवकरच दिसेल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
नोटाबंदीनंतर देशातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याची कबुली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. अर्थमंत्र्यांनी अत्यंत धाडसानं सत्य सांगितलं. आजार लपवला तर उपचार करता येणार नाही. आजार लपवणारा रोगी शेवटी मरण पावतो. देशात दोन गोष्टींनी थैमान मांडले आहे. आर्थिक मंदी आणि त्यातून निर्माण झालेला भ्रष्टाचाराचा भस्मामुर.
मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटाबंदीच्या निर्णयात आहे. सीतारमण सांगतात तो भ्रष्टाचार नोटाबंदीनंतरचा म्हणजे गेल्या साडेतीन वर्षांतला आहे. हा भ्रष्टाचार नक्की कोणत्या प्रकारचा, कोणी केला, त्यांच्यावर काय कारवाई केली याचे दाखले अर्थमंत्र्यांनी दिले असते तर बरे झाले असते.
महत्वाच्या बातम्या-
नाशिकजवळ भिषण अपघात; खासदाराचा मुलगा जखमी- https://t.co/xzCI7j8Ar5 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 24, 2019
राज ठाकरेंच्या स्टाईलमध्ये प्रसाद ओक; ईडीच्या चौकशीवरुन सरकारला टोला??? – https://t.co/se3TeXp7Do @RajThackeray @Prasad_oak
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 24, 2019
भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचीही चौकशी होऊ शकते- चंद्रकांत पाटील- https://t.co/0XgJuacKZm #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 24, 2019