“महाराष्ट्राच्या भूमीत जलीलगिरीस थारा मिळणार नाही”

मुंबई |  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानात झालेल्या कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दांडी मारली अन् चहुबाजूंनी त्यांच्यावर टीकेची झोड उठली. आज सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत.

गोव्यात जसं पोर्तुगिज आवलादींचं शेवूट आजही वळवळत आहे तसंच हैदराबादमध्ये आणि मराठवाड्यात निजामाची पिलावळ फूत्कार सोडत आहे. पण महाराष्ट्राच्या भूमीत जलीलगिरीस थारा मिळणार नाही, अशा आक्रमक शब्दात उद्धव यांनी जलीलांवर टीकास्त्र सोडलं आहे.

जलीलांनी निजामाजी चाटूगिरी करणं थांबवलं नाही तर त्यांचा औरंग्या झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेने जलीलांना दिला आहे.

औरंबादच्या मतदारांना आपण कुठलं धोंड आपल्या गळ्यात बांधून घेतलं आहे, असं म्हणण्याची वेळ येणार आहे आणि त्यांना पश्चाताप देखील होणार आहे. एमआयएम हा निजामाचा वंश असेल तर त्यांनी तसं स्पष्ट करावं. कारण बनावट देशभक्तीचं ढोंग औरंगाबादेत उघडं पडलं आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणाऱ्या खासदारास कोणत्याही शासकिय कार्यक्रमाला बोलावू नका, असा फतवाच तुम्ही काढा, अशी मागणीही शिवसेनेनं केली आहे.

महत्वाच्या बातम्या-