मुंबई | औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर होते. सगल पाचव्यांदा ते गैरहजर राहिले. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली. आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून जलील यांच्यावर शाब्दिक बाण सोडण्यात आले आहेत.
गोव्यात जसं पोर्तुगिज आवलादींचं शेवूट आजही वळवळत आहे तसंच हैदराबादमध्ये आणि मराठवाड्यात निजामाची पिलावळ फूत्कार सोडत आहे, अशी घणाघाती टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
जलीलांनी निजामाजी चाटूगिरी करणं थांबवलं नाही तर त्यांचा औरंग्या झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेने जलीलांना दिला आहे.
एमआयएम हा निजामाचा वंश असेल तर त्यांनी तसं स्पष्ट करावं. कारण बनावट देशभक्तीचं ढोंग औरंगाबादेत उघडं पडलं आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, औरंबादच्या मतदारांना आपण कुठलं धोंड आपल्या गळ्यात बांधून घेतलं आहे, असं म्हणण्याची वेळ येणार आहे आणि त्यांना पश्चाताप देखील होणार आहे, असंही म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
…तर त्यांचा ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरेंची जलीलांवर जहरी टीका https://t.co/9NhfbTTS8K @uddhavthackeray @imtiaz_jaleel #SamanaEditorial
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019
एमआयएमसाठी आमचं दार अजूनही खुलं- प्रकाश आंबेडकरhttps://t.co/FWbflAphlQ @Prksh_Ambedkar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019
पुण्याची ही जागा भाजपकडे…. प्रचार चालू केला शिवसेनेने! https://t.co/XwyuU39Ov8 @ShivSena @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019