मुंबई | खाजगीकरणाची खाज आज वाढायला लागलीय. कुठे-कुठे खाजवणार? भवितव्य अंधारात जाणार असेल तर आपणाला न्याय हक्काची लढाई लढावी लागेल. भगव्यात ती ताकद सिद्ध करण्याची वेळ आली, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
भवितव्य अंधारात जात असेल तर आपल्या संघटनेचं काम महत्त्वाचं आहे. सगळ्याचं प्रतिनिधी म्हणून काम करायला हवं. हे संपूर्ण देशात पसरलेलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
एलआयसीची जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी, अशी जाहीरात आहे. त्याच जाहीरातीसारखं माझ्या सेनेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याबद्दल विश्वास असला पाहिजे की, हर कदम हम आपके साथ है. आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आपली शिवसेना ही आपल्या बरोबर आहे हा विश्वास तुम्ही देशभर नेला आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
ज्यावेळी कोणी तुमच्यावर अन्यायाचा वार करेल त्या वारचा मुकाबला करण्याची ताकद आणि हिंमत आपल्या भगव्यामध्ये आहे, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय.
येत्या 14 तारखेला सभा घेतच आहे. सवाल जबाब होवू दे जरा. कारण कितीदिवस ऐकत बसायचं. दुसरीबाजूही कळू दे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.
दरम्यान, 14 मे तर 4 जून रोजी औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा पार पडणार आहे. त्यामुळे या दोन्ही सभांतून मुख्यमंत्री काय बोलतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
“महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, येणाऱ्या काळात निवडणुका एकत्र लढणार”
‘भोंगा आवडत नसेल तर ऐकू नका’; रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना सुनावलं
‘बहुजनांना तुमच्यासारखा काकांचा हुजऱ्या समजू नका’; पडळकरांंचा हल्लाबोल
“गुन्हे आणि आरोप फक्त आमच्यावर सिद्ध होतात, इतरांवर ते का सिद्ध होत नाहीत?”