मुंबई | परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत तसंच महाराष्ट्रातले मजूर इतर राज्यातून येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून तिकिटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील 36 जिल्ह्यांना 54 कोटी 75 लाख 47 हजार 70 रुपयांचा निधी देण्यात आला असून तो संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन विभागाने दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीप्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील रकमांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या निधीचा वापर केवळ ज्या कारणासाठी निधी वितरित करण्यात आला आहे त्यासाठीच करता येणार आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्याने कारणाने मजूर वर्गाचे हाल होत आहे. तसंच त्यांच्या पोटा-पाण्याचा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी आपापल्या गावाची वाट धरली आहे. परंतू गाड्या सुरू नसल्याने ते पायी प्रवास करत होते. मात्र शासनाने दखल घेत त्यांच्यासाठी आता विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचा हजारो कष्टकरी मजूर प्रवाशांना फायदा मिळणार आहे. आता त्यांच्याकडून तिकीटाचे पैसे न घेता हे मुख्यमंत्री सहायता निधीतून शुल्क भरले जाईल.
महत्वाच्या बातम्या-
-संभाजी राजेंनी सूत्र फिरवली; गड-किल्ले जिवंत ठेवणाऱ्यांना मदत मिळाली
-सांगलीच्या आजीबाईंचा पॅटर्नच वेगळा; वयाच्या 94 व्या वर्षी केली कोरोनावर मात!
-“देवेंद्र फडणवीस सज्जन माणूस, त्यांनी छाती फाडून दाखवायची का?”
-15 हजार पेक्षा कमी पगार असणाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी घोषणा
-म्हण…म्हणून गोपिचंद पडळकरांना विधान परिषदेचं तिकीट दिलं- चंद्रकांत पाटील