Top news महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्र्यांचा विधान परिषदेचा अर्ज दाखल; ठाकरे कुटुंबाची विधान भवनात हजेरी

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारी वरुन राज्यात खूप दिवसांपासून राजकारण सुरु होत. अगदी कालपर्यंत कॉंग्रेस-शिवसेना दोघांमध्ये विधान परिषदेच्या जागेवरुन अंतर्गत मतभेद होते. या सर्व गोष्टींना बाजूला सारत अखेर मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला. आणि आज मुख्यमंत्र्यानी विधानपरिषदेचा अर्ज दाखल केला.  अर्ज दाखल करताना  त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, त्यांचे पुत्र मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते.

तसेच अर्ज दाखल करताना शिवसेनेचे नेते संजय राऊत, अनिल देसाई, निलम गोऱ्हे, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे तसंच अमोल मिटकरी, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे, तसंच राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी देखील आपापला अर्ज दाखल केला. काँग्रेसने एकच उमेदवार उभा करण्याचा पवित्रा घेतल्याने ही निवडणूक आता बिनविरोध पार पडणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं. दुपारी 3 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज बैठक होत असल्याने ते अर्ज दाखल करून थेट मातोश्रीवर पोहचले.

महत्वाच्या बातम्या-

-“कॉंग्रेसने सचिन सावंत यांच्यासारख्या आक्रमक, अभ्यासू पदाधिकाऱ्याला संधी द्यायला हवी होती”

-‘माघारी’पेक्षा महाराष्ट्राचे हित महत्त्वाचं होतं, काँग्रेसच्या भूमिकेचं सामनामधून कौतुक

-“कतरिना माझ्याकडे आली अन् मिठी मारुन मला म्हणाली…”

-धक्कादायक! उरणमध्ये एकाच कुटुंबातील 21 जणांना झाली कोरोनाची बाधा

-प्रेरणादायी! 85 वर्षांच्या आजी मजूरांना देतायत 1 रुपयात इडली चटणी