महाराष्ट्र मुंबई

एक जूननंतर लॉकडाउन हटवणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

मुंबई | एक जूनपासून लॉकडाउन हटवणार की, आणखी शिथिलता देऊन कायम ठेवणार, एक जूननंतर महाराष्ट्र कसा असेल? या प्रश्नाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

कोरोनाबरोबर जगायला शिका हे म्हणणं ही आपली अपरिहार्यता आहे. त्यामुळे लॉकडाउन हा शब्द वापरणं आता बंद करायला हवं. कोरोनानंतरचं जग बदलेलं असेल. कोरोनासोबत जगायचं म्हणजे आपल्याला जीवनशैली बदलावी लागणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

लॉकडाउन हा शब्द म्हणण्यापेक्षा स्वतः लॉक सोबत घेऊन फिरा, असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. मास्क घालणं, सुरक्षित अंतर राखणं, सॅनिटाझर वापरणं, वारंवार तोंडाला हात न लावणं अशी खबरदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

केंद्रानं लॉकडाउन जाहीर करण्याआधीच राज्य सरकारनं एक एक गोष्ट बंद करायला सुरूवात केली होती. आता एकदम लॉकडाउन उठवता येणार नाही. परिस्थितीचा आढावा घेऊन एक एक गोष्ट सुरू केली जाईल. आतापर्यंत बऱ्याच गोष्टी सुरू केल्या आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-तिजोरी उघडा आणि गरजूंना तात्काळ मदत करा- सोनिया गांधी

-पृथ्वीराज चव्हाण यांचं हे आव्हान देवेंद्र फडणवीस स्वीकारतील का?

-…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा

-‘या’ माजी केंद्रीय राज्यमंत्र्याचा राजकीय संन्यास; फेसबुक पोस्ट करत 43 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला रामराम

-काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा; नाना रिंगणात तर बाबांच्या हाती छडी!