‘…त्याच आईला गिळायला निघालेली ही अवलाद’; उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंवर बरसले

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांना मुलाखत दिली. यात उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर आसूड ओढलेत. राजकारणात ज्या आईने जन्म दिला, त्याच आईला गिळायला निघालेली ही अवलाद आहे… ही राक्षसी महत्वकांक्षा आहे आणि याला हावरटपणा म्हणतात, अशी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर केली आहे.

ज्यावेळी शिवसेनेने यांना आधार दिला, त्यावेळी ही सगळी साधी लोकं होती, त्यांना सगळं काही देऊन माझी चूक झाली. त्यांना ताकद दिली, त्यांनी त्या ताकदीने फक्त माझ्यावर फक्त पलटवारच नाही केला तर राजकारणामध्ये ज्या आईने त्यांना जन्म दिला त्या आईलाच गिळायला निघालेली ही अवलाद आहे. पण शिवसेनेला गिळण्याची तेवढी त्यांच्यात ताकद नाहीये, असं उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना ठणकावून सांगितलं आहे.

मी ज्यावेळी गुंगीत होतो, रुग्णालयात होतो त्यावेळी काही जणांनी बाहेर हालचाली सुरु केल्या होत्या, काही जणांनी माझी प्रकृती सुधारणार नाही यासाठी काही जणांना देव पाण्यात ठेवले होते. तेच लोकं पक्ष बुडवायला निघाले होते, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.

मी कुटुंबप्रमुख, पक्ष प्रमुख शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती त्या काळामध्ये ह्यांच्या हालचाली जोरात होत्या. नाही म्हटलं तरी हे वेदनादायी सत्य आयुष्यभर राहणार आहे. की जेव्हा मी तुम्हाला जबाबदारी दिली होती पक्ष सांभाळण्याची, दोन नंबरचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळायला म्हणून पूर्ण विश्वास दिला होता. तो विश्वासघात तुम्ही केला, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

शिवसेना आणि ठाकरेंचं नात तोडण्याचा प्रयत्न केला जातोय.तुम्ही आज ज्या संघर्षमय कालखंडातून जाताय त्याची अपेक्षा केली होती?, असा सवाल संजय राऊत यांनी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना आणि संघर्ष पाचवीला पुजलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मी बरा होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात बुडवले, तेच पक्ष बुडवायला निघालेत” 

शिवसेनेला आणखी एक मोठा झटका, अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील? 

हल्लाबोल, आसूड, गोप्यस्फोट; संजय राऊतांनी शेअर केला उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर

‘अब राजा वही बनेगा जो हकदार होगा’, मनसे नेत्याच्या सूचक ट्विटने खळबळ

“राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करू नये”