“उद्धव ठाकरे म्हणजे बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री”

मुंबई | अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी यांना यांनी मुंबईत मातोश्रीवर येऊत हनुमान चालीसा पठन करणार असल्याचा इशारा दिला.

राणा दाम्पत्यांच्या इशाऱ्यावरुन शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांना मातोश्रीवर हनुमान चालीसा पठन करण्यास विरोध दर्शवला आहे.

शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा पाहून राणा दाम्पत्यांनीही ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. उद्धव ठाकरे आणि सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.

नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच कार्यकर्त्यांना आपल्या घरावर हल्ला करण्यासाठी तयार केल्याचा गंभीर दावा केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणजे बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री असल्याचं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं आहे. त्यामुळे आता वाद आणखी चिघळ्याची शक्यता आहे.

गेली दोन वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले नाहीत. पण काल ते मातोश्री परिसरात शिवसैनिकांना भेटले. याच बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आमच्या घरावर हल्ला करण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्री हे सध्या फक्त कोणाला आत टाकायचे, कोणावर कोणती केस करायची, हेच काम करत आहेत, असा घणाघातही नवनवीत राणा यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘मुख्यमंत्र्यांवर किती हल्ले झाले तरी त्यांनी….’; सुप्रिया सुळेंकडून कौतुकांचा वर्षाव

  ‘उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेला शनी’; राणा दाम्पत्यांचा हल्लाबोल

  राजकीय वर्तुळात मोठी खळबळ ! ‘या’ शिवसेना मंत्र्याच्या पीएवर गोळीबार

  “शिवसेनेनं आमच्यासोबत बेईमानी केली म्हणून….”; भाजपचा हल्लाबोल

  “देशात सध्या एकमेकांना संपवण्याचा कार्यक्रम सुरु आहे”