मुंबई | शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना एक मुलाखत दिली. संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना (Samna) वृत्तपत्रासाठी त्यांची मुलाखत घेतली. त्यांची ही मुलाखत दि. 26 आणि 27 रोजी सामनात छापून आली होती.
सदर मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर सडकून टीका केली. त्यांच्या मुलाखतीत त्यांनी एकनाथ शिंदे यांनी कशा प्रकारे आपल्या आजारपणाचा फायदा घेत विश्वासघात केला, यावर भाष्य केले.
त्यांच्या सदर मुलाखतीनंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका करत त्यांच्या या मुलाखतीची टिंगल केली होती. तसेच ही मुलाखत म्हणजे एक फिक्स क्रिकेट मॅच होती, असे म्हटले होते.
आता उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीला आणि टीकेला भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सत्तापिपासू, खरा असंस्कृत आणि अकार्यक्षम मुख्यमंत्री कोण असेल तर त्याचे नाव उद्धव ठाकरे आहे, अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली.
या मुलाखतीवर भाष्य करताना त्यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर देखील निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांची सध्या शिवसंवाद यात्रा सुरु आहे. तेव्हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यापूर्वी कुठे होते? असा प्रश्न त्यांनी विचारला.
गेली अडीच वर्षे वर्षा बंगल्यावर कोणत्या बिळात लपून बसला होता? तुम्ही जर गुंगीत होता, तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला नाही? कालपासून महाराष्ट्रात रुदालीचा प्रयोग सुरु आहे. त्यांच्या या मुलाखतीला काडीची किंमत नाही, असे भातखळकर म्हणाले.
उद्धव ठाकरेंकडे रोज नवनव्या टीका करण्यापलीकडे आता काही उरले नाही. स्वत:ची बडवायची आणि मला सहानुभूती द्या असे म्हणायचे. ते कधी मंत्रालयात फिरकले नाहीत, पीएम रिलिफ फंड दिला नाही. कोणता निर्णय घेतला नाही, असे कडक आणि गंभीर आरोप भातकळकरांनी यावेळी केले.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आता रोज सभा आणि मेळावे घेत आहेत. आता त्यांचे आजारपण कुठे गेले? कोरोना काळात आदित्य ठाकरे कुठे गेले होते? सर्व तुमच्या बु़डाखाली हवे, ही तुमची इच्छा होती, म्हणून तुम्ही मुख्यमंत्रीपदी होता, असे देखील भातखळकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
“बाळासाहेबांच्या पोटी आलात म्हणजे काही राजा झालात का?”
‘उद्धव ठाकरे दोन वेळा घरातून पळून गेले होते’, नारायण राणेंचा गौप्यस्फोट
“काय ते प्रश्न.. काय ती उत्तरं.. काय तो घरगुती कार्यक्रम.. एकदम ओक्के”
“उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच आहे”
“तुमच्यात कर्तृत्व नाहीये, तुम्ही मर्द नाहीत, शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका”