उद्धव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त आमदार करण्यास राज्यपालांना कोणतीच अडचण नाही; कारण…

नाशिक | उद्धव ठाकरे हे फोटोग्राफर, सामनाचे संपादक, आणि एक कलाकार असल्यानं, त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्त करण्यास राज्यपालांना कोणतीही अडचण नाही. त्यांना निर्णय घ्यावाच लागेल, असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याबाबतचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला आहे. मात्र राज्यपालांनी त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही.

भाजपनेही मंत्रिमंडळ निर्णयाला आक्षेप घेत, उद्धव ठाकरे हे राज्यपाल नियुक्त आमदार होऊ शकत नाहीत, असं म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपालांकडे बोट दाखवत, राज्यपाल निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं म्हटलं आहे. छगन भुजबळांनीही राज्यपालांना निर्णय घ्यावा लागेल, असं म्हणत आपली बाजू मांडली.

महत्वाच्या बातम्या-

-गृहमंत्री अनिल देशमुखांनी आजीबाईंना स्वत: घातला मास्क

-लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने बंदच राहणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण

-सपना चौधरीनं शेअर केला व्हिडीओ; म्हणाली, तुमच्या सर्वांची खूप आठवण येतेय!

-आम्ही दिलेले टेस्ट किट उत्तमच पण भारतीयांना वापरायच्या कळत नाही; चीनचं भारताकडे बोट

-तळीरामांच्या कोरड्या घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केलीये?; अग्रलेखातून सवाल