पटना | अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येने सर्वांना धक्का बसला होता. सध्या हे प्रकरण वेगळीच दिशा घेऊ लागलं आहे. कारण सुरूवातीला बॉलिवूडमधील घराणेशाही, नेपोटिझम आमि इंडस्ट्रीतील काही कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांची नावे येऊ लागली होती. मात्र आता सुशांतच्या वडिलांनी सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवतीवर अनेक धक्कादायक आरोप केल्याने ती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
या दरम्यान बिहार राज्याचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुशांत सिहंच्या आत्महत्येबाबत सरकार दबावाखाली असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि बॉलिवूडमधल्या माफियांच्या दबावाखाली आहेत असा गंभीर आरोप सुशीलकुमार मोदींनी केला आहे.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा बिहारचा सुपुत्र होता. त्याच्या मृत्यू प्रकरणात चौकशीसाठी मुंबईला पोहचलेल्या बिहार पोलिसांना योग्य सहकार्य केलं जात नाही अशीही टीका सुशीलकुमार मोदी यांनी केली आहे.
अब बिहार के बेटे सुशांत सिंह राजपूत की मौत की जांच के लिए के लिए पहुंची बिहार पुलिस को मुम्बई पुलिस का सहयोग नहीं मिल रहा है।
— Sushil Kumar Modi (@SushilModi) August 1, 2020
महत्वाच्या बातम्या-
राज्याच्या आरोग्यमंत्र्यांवर दु: खाचा डोंगर; राजेश टोपेंच्या मातोश्रींचं निधन
“आम्ही येतोय रे ठाण्याला कोण अडवतंय बघूया, हे सरकार शिवशाहीचं नाही तर मोघलाईचं आहे”
दडी मारलेला पाऊस करणार दैना; पुढील 4 दिवस ‘या’ भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता