“प्रथा, परंपरा माहीत नाही तरीसुद्धा मी हे शिवधनुष्य उचललं आहे”

मुंबई |  ठाकरे कुटुंबाने स्वतःसाठी कधीच काही केलं नाही. आज माझ्यावर मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी आली आहे. ती मी स्वीकारली. ती जर मी टाकून पळालो असतो तर मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र म्हणून घेण्यास पात्र ठरलो नसतो असं म्हणत प्रथा, परंपरा माहीत नाही तरीसुद्धा मी शिवधनुष्य उचललं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

एखादी घोषणा केल्यानंतर त्याची कोणत्याही जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी झाली नाही ते तुम्ही मला सांगा. मी मुख्यमंत्री म्हणून येईन असं सांगितलं नव्हतं, न सांगता मुख्यमंत्री म्हणून आलोय, असंही ते म्हणाले.

महागाई, टंचाई, भ्रष्टाचार हे अजूनही तसंच आहे, मी विधानसभेचे सभागृह अजूनही बघितलेले नाही. तसंच  टीका करताना चुका दाखवा, ओरबाडणे म्हणजे टीका करणे नाही, असंही ते म्हणाले

दरम्यान, आरे कारशेडच्या कामाला स्थगिती, रिव्हू घेतल्याशिवाय काम नाही, असा मोठा निर्णयही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत जाहीर केला.

 

महत्त्वाच्या बातम्या-