महाराष्ट्र मुंबई

शरद पवार शिवसेनेत प्रवेश करतील असं वाटत नाही- उद्धव ठाकरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी हातावर शिवबंधन बांधून घेतलं.

सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जोरदार चिमटा काढला. सचिन अहिर शिवसेनेत आले असले तरी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष येतील, असं वाटत नाही, असं ते म्हणाले. 

पक्ष फोडणं ही शिवसेनेची भूमिका नाही. मला फोडलेली माणसं नको आहेत. मनानं जिंकलेली माणसं हवी आहेत, असं त्यांनी म्हटलं.

शिवसेनाप्रमुखांचे शिवसैनिक, सर्व सोबत आहेत. शिवसेनेची नव्हे, तर मराठी माणूस आणि हिंदूंची ताकद वाढत आहे. मराठी माणूस आणि हिंदूंकडे कोणीही वाकड्या नजरेनं पाहणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

मी घड्याळ्याचे दोन्ही काटे तसेच ठेवले आहेत, मी फक्त चावी मारण्याचे काम करतो. हे आले असले तरी त्यांचे पक्षाध्यक्ष येतील असे वाटत नाही, असा चिमटा त्यांनी यावेळी शरद पवार यांना काढला.

सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने मुंबईत राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

काय म्हणाले सचिन अहिर?-

मी राष्ट्रवादी फोडणार नाही, तर शिवसेना वाढवण्याचं काम करणार आहे. मला असंख्य कार्यकर्त्यांचा फोन येत आहे, असं सचिन अहेर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर म्हटलं आहे.

पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे-

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीनंतर काँग्रेसला धक्का; हा आमदार भाजपच्या गळाला??

-भाजप प्रवेशाला नाही म्हटले म्हणूनच मुश्रीफांच्या घरावर धाड??

-“मला फोडलेली माणसं नकोत, मला मनाने जिंकलेली माणसं पाहिजेत”

-“विधानसभेला तरूणांची मला 15 नावे द्या… मी त्यांना उमेदवारी देतो”

-शिवसेनेत प्रवेश करणार का?, छगन भुजबळ म्हणतात…

IMPIMP