‘स्वत:चा मुलगा खासदार आहे त्याचं काय’, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

मुंबई | एकनाथ शिंदेच्या बंडाळीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदारांना सोबत घेत बंड पुकारल्यानंतर आता शिवसेनेतच दोन गट पडलेले पाहायला मिळत आहे.

अजूनही अनेक शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या बाजूला असून आमदार मोठ्या संख्येने शिंदे गटात गेलेले पाहायला मिळत आहेत. शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने शिवसेनेतील भगदाड मोठं होत चालल्याचं पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदेच्या बंडखोरीवर आता उद्धव ठाकरेंनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. आज शिवसेना भवनात शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली आहे.

शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर आरोप केले. मात्र, स्वत:चा मुलगा खासदार आहे त्याचं काय? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी शिंदेंना उद्देशून उपस्थित केला आहे.

तुम्हाला अजिबात ब्लॅकमेल करत नाही. माझ्या प्रेमात अडकू नका, माझ्या मोहात अडकू नका, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

जसा मी बाळासाहेबांचा पुत्र आहे. तसं त्यांचं लाडकं अपत्य शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेना पुढे कशी जाईल याचा विचार करून निर्णय घ्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह भाजपवरही निशाणा साधला आहे. शिंदे ते तुम्हाला वापरतील आणि फेकून देतील, असा इशारा देखील उद्धव ठाकरेंनी शिंदेंना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“बंडखोर आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवा, आम्ही योग्य तो पाहुणचार करू”

शिवसेनेनं केलेल्या ‘या’ मागणीमुळे एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या

“महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही कारण…”

एकनाथ शिंदे गटाला मोठा झटका; विधानसभा उपाध्यक्षांचं मोठं वक्तव्य

‘…तर घर गाठणं कठीण होईल’; नारायण राणेंची शरद पवारांना धमकी