मुंबई | माजी मंत्री पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करतील, अशा जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. अशातच पंकजा मुंडे यांनी 28 नोव्हेंबरला केलेल्या शुभेच्छापर ट्विटला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रिप्लाय दिला असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
आपले मनःपूर्वक धन्यवाद पंकजा ताई मुंडे! ‘राज्याचे हित प्रथम’ याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो, असा रिप्लाय उद्धव ठाकरे यांनी पंकजा यांच्या ट्विटला दिला आहे.
आदरणीय व प्रिय उद्धवजी यांना मनःस्वी शुभकामना!! एका ठाकरेनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि एक मुख्यमंत्री झाले..हार्दिक अभिनंदन!! महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरा हीच आहे ‘राज्याचे हित प्रथम ‘!! राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!’, असं ट्विट करत पंकजांनी 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या होत्या.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडेंसंबंधात सूचक वक्तव्य केलं होतं. भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. पंकजा मुंडे 12 डिंसेबरला काय तो निर्णय घेतील, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
आदरणीय बाळासाहेबांच्या स्वप्नांना व मराठी माणसाला असलेल्या अपेक्षा आपण पूर्णत्वाकडे घेऊन जाल हीच ईश्वर चरणी प्रार्थना !! @ShivSena @OfficeofUT #UddhavMahaCM @AUThackeray
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) November 28, 2019
महत्वाच्या बातम्या-