मुंबई | तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सध्या मुंबई दौऱ्यावर आहे. आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.
के. चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे यांची जवळपास दीड तास भेट झाली. त्यांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीतल्या चर्चेविषयी माहिती दिली.
आमच्यातील सदिच्छ भेट होती, त्यात काही लपवण्यासारखे नाही, असं उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगतिलं.
आम्ही बऱ्याच दिवसांपासून भेटणार होतो, आज तो दिवस उजाडला, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं सांगतिलं.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रावरही निशाणा साधल्याचं पहायला मिळालं. देशात सुडाचे राजकारण सुरु झाले आहे. सूडाचे राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
देशात परिवर्तन होण्याची गरज आहे. परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचे एकमत झाले आहे. याशिवाय काही दुसऱ्या मुद्दायंवरही एकमत झाल्याचं त्यांनी सांगितलं.
आज ज्या पद्धतीने देश चालला आहे, त्यात बदल झाला पाहिजे. देशात एका मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. देशातल्या युवकांनी देशातला महोल नाही खराब केला पाहिजे. अशी आमची अपेक्षा आहे. इतर पार्टीच्या लोकांशीही आम्ही एकत्र काम करण्याबाबत बोलणार आहोत, असंही पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.
राज्यात सध्या केसीआर आणि ठाकरे यांच्या भेटीची चर्चा सुरु असल्याचं दिसत आहे. त्यामुळे विरोधकही सरकारवर निशाणा साधत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“उद्धव साहेब, सनम हम तो डूबेंगे, पर तुझे भी लेकर डूबेंगे”
मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र, दिल्या ‘या’ सूचना
‘चौकशी होणार कळल्यामुळे संजय राऊत सैरभैर झालेत, त्यांना आवरा’
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अन् भाजपला शिवसेनेचा जोर का झटका!