“बंगालमध्ये दीदींनी जसं भाजपला गाडलं, ती वेळ आता महाराष्ट्रात आलीये”

मुंबई | राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. आपल्या आमदारांना सुरक्षित ठेऊन अपक्ष आमदारांना गळाला लावण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे.

महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक ट्रायडंटवर पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांना संबोधित केलं. यावेळी बंगालमध्ये दीदींनी जसं भाजपला गाडलं, ती वेळ आता महाराष्ट्रात आलीये, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आपले चारही उमेदवार विजयी होतील. राज्यसभेपाठोपाठ होणारी विधानपरिषदेची निवडणूकही आपण जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना संबोधित करताना बोलून दाखवला.

मतदानापूर्वी एकत्र राहा. मविआचे चारही उमेदवार निवडून आणा, असं ठाकरे मुख्यमंत्री आमदारांना म्हणाले. राज्यसभा, विधानपरिषदेची निवडणूक झाल्यावर आपण पुन्हा भेटू आणि पार्टी करू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.

राज्यसभा, विधानपरिषदेची निवडणूक झाल्यावर आपण पुन्हा भेटू आणि पार्टी करू, असंही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सहा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी भाजपने सातवा उमेदवार दिल्यामुळे रस्सीखेच वाढलीये.

शिवसेनेचे आमदार मुंबईत रिट्रीट हॉटेलमध्ये दाखल होत आहेत. भाजपने आपल्या आमदारांची ताज हॉटेलमध्ये मुक्कामाची सोय केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आपल्या आमदारांना आज सुरक्षितस्थळी हलवल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी 

राज्यातील आमदार मुक्कामी असलेल्या हॉटेल्सचा एका माणसाचा दिवसाचा खर्च आहे ‘इतका’

शरद पवारांवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी केतकी चितळेला न्यायालयाचा दणका! 

मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या नवाब मलिकांचा खळबळजनक खुलासा, म्हणाले… 

मोठी बातमी! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचा झटका