“शिंदे गेले ते बरेच झाले, असंगाशी…”; उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदेवर मोठी टीका

मुंबई | शिवसेनेत बंड झाल्यापासून शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वाद शिगेला पोहोचले आहेत. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण महाविकास आघाडी सोडून योग्य केल्याचे सांगितले.

त्याचा आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी समाचार घेतला. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने युती केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेची ताकद वाढली. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी त्याची अधिकृत घोषणा केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तिखट शब्दात सुनावले आहे. शिंदे हे माझ्यापासून दूर गेले हे बरे झाले. असंगाशी संग सुटला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी आपल्या यंत्रणांकडून माहिती घ्यावी आणि नंतरच बोलावे, असा सल्ला देखील उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात देखील एकत्र काम करणार आहेत. दोनही पक्ष निवडणुका सुद्धा एकत्रीतपणे लढविणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण बदलणार आहे असा त्यांचा दावा आहे.

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना कंत्राटी मुख्यमंत्री म्हंटले होते असा त्यांच्यावर आरोप होता. त्यामुळे त्यांना त्याच्यावर विचारले असता, ठाकरे म्हणाले, मी त्यांना कोणताही मुख्यमंत्री म्हणालो नाही.

कंत्राटी पदावर नोकरभरती करणार असल्याचा शासनाचा विचार होता. त्यामुळे मी म्हणालो, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कंत्राटी पद्धतीने का नेमू नये? टेंडर काढा आणि मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नेमा, असे ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

अनुपम खेर यांचे बॉलिवुडबाबत मोठे वक्तव्य; म्हणाले, दाक्षिणात्य चित्रपट कथेवर लक्ष केंद्रीत…

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ; शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले

मोठी बातमी! काँग्रेसला मोठा दणका, एका माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा

‘आदित्य ठाकरेंची दिशा चुकली’ या घोषणेमागील ‘दिशा’ कोण? भरत गोगावले म्हणाले,

पाषाण तलाव परिसरात आणि उद्यानात प्रेमी युगुलांना बंदी; जाणून घ्या कारण