मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केले आणि भाजपच्या आश्रयाला गेले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळले. तेव्हापासून भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) वाद सुरु झाले.
भाजप पक्षाला आपण शिवसेना संपवली असे वाटत आहे. कारण तीन दिवासापूर्वी भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी आपण देशातील सगळे पक्ष संपविणार असून फक्त भाजप शिल्लक रहाणार असे म्हंटले होते.
त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चांगला समाचार घेतला होता. त्यांनी यावेळी गुजरात दंगलींची (2002 Gujrat Riots) आठवण करुन दिली. गुजरात दंगलीत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पाठिशी फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उभे राहिले होते, असे ठाकरे म्हणाले.
जे शिवसेनाप्रमुख गुजरात दंगलीत मोदींच्या पाठिशी उभे राहिले होते, त्याच शिवसेनाप्रमुखांची शिवसेना संपविण्यासाठी भाजप आता पुढे सरसावला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा कोणत्या हवेत आहेत, असा प्रश्न ठाकरे यांनी विचारला.
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे इतरांच्या तुलनेत बरे आहेत, असा आमचा समज होता. एक तर ते हिमाचल सारख्या शातं आणि थंड प्रदेशातून आले आहेत आणि अ. भा. वि. परिषदेतून (ABVP) राजकारणात आले होते, त्यामुळे त्यांना लोकशाहीचे भान असावे असे देखील आम्हाला वाटत होते, पण अखेर नड्डा देखील सब घोडे बारा टक्के निघाले, असे ठाकरे म्हणाले.
नड्डा यांनी म्हटलं देशात फक्त भाजप टिकेल. शिवसेनेसह सर्व प्रादेशिक पक्ष संपले आहेत. काँग्रेस देखील आता संपुष्टात आल्यासारखी आहे. त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य अहंकार आणि गर्वाने फुगलेले आहेत, असे म्हणत ठाकरेंनी नड्डा आणि भाजपला सुनावले.
शिवसेनेला संपवण्याची भाषा करण म्हणजे कृतघ्नतेचा कळस आहे. याच शिवसेनेने पंचविस वर्षे भाजपला खांद्यावर घेऊन फिरवले होेते. आज संबंधात दुरावा आला असला तरी अजूनही तुम्ही हिंदुुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) नाव घेऊन राजकारण करत आहात, असे ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
उर्फीने कपड्यांऐवजी गुंडाळल्या तारा, पाहा व्हिडीओ
मनसेचे शिंदे गटावर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
“त्या तीन पक्षांची स्थिती म्हणजे म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा”
‘दगड मारुन पळून जाण्यात मर्दुमकी नाही’, सामंतांवरील हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे संतापले