न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘कमळाबाई’ म्हणत भाजपची सामनातून केली पोलखोल

मुंबई | राज्यातील शिवसेना (Shivsena) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट या वादावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) सुनावणी पार पडली. यात दोनही बाजूंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे वकील कपील सिब्बल यांनी केली. मात्र, शिवसेनेची याचिका न्यायालयाने फेटाळली.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने पक्षाच्या चिन्हाचा, आणि खरी शिवसेना कोणाची? हा निर्णय घेण्याची मुभा निवडणूक आयोगाला दिली आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मंगळवारी झालेल्या सुनावणीनंतर आज शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाजपवर टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखात पुन्हा एकदा ‘कमळाबाई’ म्हणत भाजपवर टीका केली गेली आहे.

मुंबईवरील संकंटाचा प्रत्येक घाव शिवसेनेने छातीवर झेलला आहे. शिवसेनेचा दांडिया अस्सल मर्दानी असतो. शिवसेनेच्या शाखा म्हणजे चोवीस तास लोकांसाठी उघडी असलेली जनमंदिरे आहेत.

तसेच शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची केलेली रचना आजही मजबूत पायांवर उभी आहे. त्यामुळे ती कमळाबाईच्या दांडियाने इंचभरही हलणार नाही, असे सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हंटले आहे.

मुंबई महापालिकेवरील भगवा झेंडा खाली खेचण्यासाठी भाजपच्या कमळाबाई अनेक क्लृप्त्या आणि युक्त्या करीत आहेत. एका बाजूला मराठी समाजात फूट पाडायची आणि दुसरीकडे शाकाहार आणि मांसाहार असे विषय घेऊन इतर प्रांतीय समाजाला वेगळे करायचे, असे भाजपचे एकंदरीत धोरण आहे, असे शिवसेनेेने म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

“…तोपर्यंत नरेंद्र मोदी मला संपवू शकत नाहीत”; पंकजा मुंडे यांचे पक्षाच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात केंद्राचा मोठा निर्णय’ बेकायदेशीर ठरवत पुढील…

गिरीश महाजनांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला! फडणवीस म्हणाले…

कोणत्या अधिकारात तुम्ही निवडणूक आयोगाकडे गेलात? न्यायालयाने शिंदे यांच्या वकिलाला फटकारले

“…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार” – घटनातज्ज्ञ उल्हास बापट