“मी मुख्यमंत्री होईन असं कधी वाटलंही नव्हतं, पण…”

मुंबई | भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या रौप्य महोत्सव समारंभात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलं.

मुख्यमंत्री बनणं हे माझं कधीच स्वप्न नव्हतं, मी मुख्यमंत्री बनेन असं माझ्या स्वप्नातही आलं नाही. पण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि माझ्यावर राज्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आली, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

मी मुख्यमंत्री होईल, असं जरी मला वाटलं नव्हतं तरी मुख्यमंत्री माझ्या पक्षाचाचं असेल हे माझं स्वप्न होतं. तसेच मी असेपर्यंत सीएम माझ्या पक्षाचा होत राहिन, हे ही माझं स्वप्न आहे, असंही त्यांनी सांगितलं.

खाजगीकरणाची खाज आज वाढायला लागलीय. कुठे-कुठे खाजवणार? भवितव्य अंधारात जाणार असेल तर आपणाला न्याय हक्काची लढाई लढावी लागेल. भगव्यात ती ताकद सिद्ध करण्याची वेळ आली, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

भवितव्य अंधारात जात असेल तर आपल्या संघटनेचं काम महत्त्वाचं आहे. सगळ्याचं प्रतिनिधी म्हणून काम करायला हवं. हे संपूर्ण देशात पसरलेलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

एलआयसीची जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी, अशी जाहीरात आहे. त्याच जाहीरातीसारखं माझ्या सेनेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याबद्दल विश्वास असला पाहिजे की, हर कदम हम आपके साथ है, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

सपना चौधरीच्या ‘या’ गाण्यावर तरुणाई फिदा, 32 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला व्हिडीओ 

“खासगीकरणाची खाज वाढायला लागलीय, कुठे-कुठे खाजवणार?” 

 “महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, येणाऱ्या काळात निवडणुका एकत्र लढणार”

‘भोंगा आवडत नसेल तर ऐकू नका’; रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना सुनावलं

 ‘बहुजनांना तुमच्यासारखा काकांचा हुजऱ्या समजू नका’; पडळकरांंचा हल्लाबोल