“तुम्ही सोबत असता तर मी हे सर्व टीव्हीवर बघितलं असतं”

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळात बोलत असताना तुफान फटकेबाजी केली आहे. तुम्ही माझ्यासोबत असता ना, तर मी हा सर्व कारभार टीव्हीवर बसून बघितला असता, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

गेल्या पाच वर्षात मी सरकाराला दगा देण्याचा प्रयत्न केला नाही. तुमच्या चांगल्या कामाआड माझी शिवसेना, माझा पक्ष येऊ दिला नाही. तेव्हाचे सर्व सहकारी आजही माझ्यासोबत आहे. त्यांना मी सक्त ताकीद दिली होती. की जे बोलायचं ते स्पष्ट बोलायचं कपट कारस्थान आणि काळोखात काही बोलायचं नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

मध्यरात्रीचे खलबंत करायची नाही. असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना लगावला. पण महाराष्ट्राच्या जनतेसाठी जर मला रात्रीचं बसायला लागलं तरी माझी सर्व तयारी आहे. असंही  उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांकडून आम्ही पाच वर्षे खूप काही शिकलो आहोत. तुम्ही मित्र होतात हे मी लपवलं नाही, पुढेही राहणार आहात, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-