प्रत्येक वाक्याला अध्यक्ष महोदय म्हणायलाच हवं का?; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

मुंबई : सभागृहाचे नेते म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांचं विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. तसेच यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडे बघत अध्यक्ष महोदय असं सातत्याने म्हणायला हवं का? प्रत्येक वाक्याला म्हणायलाच हवं का? तुम्हाला सभागृहाचा मोठा अनुभव आहे. शिवाय तुम्ही आम्ही 25 वर्षे सोबत होतो. ते लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला सांभाळून घ्याल, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला आहे.

देवेंद्र फडणवीसांना विधानसभेत ‘अध्यक्ष महोदय’ हा शब्द सातत्याने उच्चारण्याची सवय आहे. ते अनेकांनी अनेक वेळा ऐकलंय. त्यावरूनच उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची फिरकी घेतली आहे.

दरम्यान, अध्यक्ष महोदय म्हणणं हा आदराचा भाग आहे. ते प्रत्येक वाक्याला म्हणायलाच पाहिजे असं नाही. एकदा सुरूवातील म्हणालात तर ते पुरेसं आहे, महाविकास आघाडीच्या नेत्यानं म्हणताच सभागृहात हशा पिकला.

महत्वाच्या बातम्या-