मुंबई | समोर बसा. मी आज माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतो आहे. हा कुठेही लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी अजिबात नाही. काय होईल जास्तीत जास्त? परत लढू. जोपर्यंत माझ्यासोबतच शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आज शिवसैनिकांनाही आवाहन करतोय. ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं जे म्हणतात त्यालाही माझ्याकडे उत्तर आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन. पण समोर येऊन सांगायला हवं. मी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना प्रमुखपद सोडेन. मी मुख्यमंत्रीपद सोडून पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत असेल, तर मला आनंद आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा. समोर या, आणि सांगा, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री पदावर नको असेल तर मी का राहू? माझ्याशी थेट का बोलत नाही? सुरतला जाण्याची काय गरज, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
मी ज्यांना माझे मानतो, त्यांच्यापैकी कितीजण तिकडे गेलेत? माझ्याविरुद्ध मतदान केल? हे महत्त्वाचं नाही. माझ्याविरोधात एकानंही मतदान केलं, तरी माझ्यासाठी ती लाजिरवाणी बाब आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
एकच सांगेन. पदं येत असतात, जात असतात. आयुष्याची कमाई पदं नसतात. तिथे बसून तुम्ही जे काम करता, त्यानंतर जनतेची जी प्रतिक्रिया असते, ती कमाई असते. या अडीच वर्षात आपली कुठे भेट झाली? याच माध्यमातून आपण भेटलो आहोत. ही आयुष्याची कमाई माझ्यासाठी भरपूर आहे, असंही ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, उद्धव ठाकरेंचा ‘हा’ निर्णय केला रद्द
“…तर काेणीच मुख्यमंत्री बनणार नाही, राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल”
‘संध्याकाळी 5 पर्यंत मुंबईत या, अन्यथा…’; बंडखोर आमदारांना शिवसेनेचा इशारा
“शिवसैनिकांनो काळजी करू नका, हा बाळासाहेबांचा जिगरी दोस्त अजून म्हातारा झाला नाही”
‘त्या’ दिवशी नेमकं असं काय झालं की शिंदेंनी डायरेक्ट सूरत गाठलं?, खरं कारण आलं समोर