मुंबई | आपल्याला खूप सावध राहून पुढे जगावं लागणार आहे. जर तुम्ही गर्दी केली तर पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
ज्याप्रमाणे लॉकडाउन आपण टप्प्याटप्प्याने लागू केला त्याचप्रमाणे शिथीलता आणत आहोत. अजूनही संकट टळलेलं नाही. अजूनही लढा संपलेला नाही. कोरोनासोबत लढत असताना अर्थचक्र बंद करुन चालणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
कोरोनासोबत जगायला शिका असं जगभरात सांगितलं जात आहे. सरकारने निर्बंध शिथील केल्यानंतर जी काही झुंबड उडाली ती पाहून थोडी धाकधूक वाटली. आरोग्यासाठी व्यायाम करायला मिळावा यासाठी बाहेर पडायची परवानगी दिली आहे. आरोग्य खराब कऱण्यासाठी नाही. आपण एकमेकांपासून अंतर ठेवलं पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेत आहे. जर धोका वाढत असल्याचं लक्षात आलं तर नाइलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागेल. पण महाराष्ट्रातील जनता सहकार्य करणारी आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कोरोनाच्या संकटकाळात उद्धव ठाकरेंच्या जागी कोणी दुसरं असतं तर…- जितेंद्र जोशी
-लग्नास नकार दिल्यानं भाच्यानं मामाच्या पोरीला पळवलं, उसाच्या फडात रंगला पकडापकडीचा खेळ
-“नक्की खोटं कोण बोलतंय, नरेंद्र मोदी की देवेंद्र फडणवीस?”
-‘उद्धव ठाकरे दाढी कुठं करतात?, केस कुठं कापतात?’; ‘या’ भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला
-“मी दौरा केल्यामुळे मुख्यमंत्री अन् शरद पवारांना दौरा करावा लागला”