महाराष्ट्र मुंबई

31 मेनंतर लॉकडाऊन संपणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…

मुंबई | कोरोनाचे रुग्ण आणखी काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढणार असून, गुणाकाराने कोरोना पसरणार आहे. लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवा, ज्या पद्धतीने हळूहळू लॉकडाऊन घालण्यात आला तसंच हळूहळू लॉकडाऊन उठवण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

कोरोनासोबत जगायला शिका म्हणजे, सोशल डिस्टन्सिंग पाळा, तोंडाला मास्क लावा, रस्त्यावर थुंकू नका, हात वारंवार स्वच्छ ठेवा हे करावं लागणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

लॉकडाऊन शब्द न वापरता आम्ही काय काय सुरू करणार याची यादी देऊ, या गोष्टी सुरळीत राहण्याची जबाबदारी सरकारपेक्षा लोकांची जास्त आहे. पुढील काही दिवस धार्मिक, सामाजिक, सण-उत्सव घरातच साजरे करा, प्रत्येक धर्मातील लोकांनी आपापल्या ईश्वराकडे प्रार्थना करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

दरम्यान, पावसात जास्त काळजी घेण्याची गरज आहे. पावसाळ्यात विनाकारण भिजणे शक्यतो टाळा, रोगराई आणि साथी आपल्याला टाळायला हव्या, पाणी उकळून प्या, सर्दी, खोकला दिसल्यात तातडीनं डॉक्टरकडे जाण्याची गरज असल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘…तर पुन्हा सगळं बंद करावं लागणार’; उद्धव ठाकरेंचा इशारा

-‘एक वेळ माझा गळा चिरा, पण…’; ममता बॅनर्जी आक्रमक

-‘हा संकटाचा काळ आहे कुणीही राजकारण करु नका’; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं

-‘जो मोदी जी की आरती गावे….’; ‘या’ भाजप मंत्र्याकडून नरेंद्र मोदींची आरती लाँच

-“केंद्र सरकारने लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती काय आलं?”