नक्की कुठे चुकलं?, उद्धव ठाकरे म्हणाले ‘गुन्हा माझाय, चूक माझी आहे’

मुंबई | राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकार स्थापन झालं आहे. यानंतर उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांची भूमिका मांडली आहे. यावेळी नक्की चुकलं कुठं?, असा सवाल संजय राऊत यांनी केला. यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

चूक माझी आहे ते मी माझ्या फेसबुक लाईव्हमध्ये पहिल्यांदाच सांगितलं आहे. मी कबूल केलं आहे गुन्हा माझा आहे. तो म्हणजे मी यांना परिवारातला समजून मी यांच्यावरती अंधविश्वास ठेवला, असं ते म्हणालेत.

महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? त्यावर ठाकरेंनी उत्तर दिलं की, महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला असता तर लोकांनी उठाव केला असता. तसं झालं नाही. जनता आनंद होती. कारण सत्तेत आल्या आल्या आम्ही शेतकऱ्यांना पहिल्यांदा कर्जमुक्त केलं होतं. त्याच्यानंतर मी अभिमानाने सांगेन, कोरोना काळात संपूर्ण माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी उत्तम सहकार्य केलं, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा आणि शिवसेना भवन कुणाचं? अशी चर्चाही राज्याच्या राजकारणात सुरु आहे. यावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. शिवसेना कायम ठाकरेंचीच आहे. त्यासाठी आम्हाला पुरावे देण्याची गरज नाही. जनता निवडणुकीची वाट पाहत आहे. जनताच आमचे पुरावे देईल, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

मी ज्यावेळी गुंगीत होतो, रुग्णालयात होतो त्यावेळी काही जणांनी बाहेर हालचाली सुरु केल्या होत्या, काही जणांनी माझी प्रकृती सुधारणार नाही यासाठी काही जणांना देव पाण्यात ठेवले होते. तेच लोकं पक्ष बुडवायला निघाले होते, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.

देशभरात पर्यटन करण्याची गरज लागली नसती. हजारो कोटी रुपये खर्च केले केले असे मी ऐकलं. विमानांचा खर्च, हॉटेलचा खर्च, त्याच्यानंतर काही अतिरिक्त खर्च म्हणजे खोक्यातला खर्च, खोक्यात काय दडलंय? ते देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला माहित. पण हे फुकटात झालं असतं आणि सन्मानाने झालं असतं, असंही उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना सुनावलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

शिवसेनेतच फूट का पडते?, उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण 

‘…त्याच आईला गिळायला निघालेली ही अवलाद’; उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंवर बरसले 

“मी बरा होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात बुडवले, तेच पक्ष बुडवायला निघालेत” 

शिवसेनेला आणखी एक मोठा झटका, अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील? 

हल्लाबोल, आसूड, गोप्यस्फोट; संजय राऊतांनी शेअर केला उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर