मुंबई : विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली त्यानंतर त्यांनी आपला कार्यभार स्विकारला आहे. यावेळी सभागृहाचे नेते म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पटोले यांचं अभिनंदन केलं आहे.
सभागृहाचा नेता म्हणून सभागृहाच्यावतीने आपलं स्वागत करतो. शेतकरीपुत्र विधानसभा अध्यक्ष झाला याचा आपल्याला आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
विधानसभा हे राज्याचे सर्वोच्च सभागृह आहे. याचं कामकाज तुम्ही चांगल्यापद्धतीने पार पाडाल ही अपेक्षा व्यक्त करतो. आपला स्वभाव बंडखोर स्वरुपाचा आणि अन्याय सहन न करणारा आहे. आपलं मत मांडताना कोणाचीही भीती न बाळगणारा महाराष्ट्राचा हा सुपुत्र अध्यक्षदी विराजमान झाला आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, आमच्या कोणावरही अन्याय न होता आमच्याकडून काही चुकीचं घडल्यास आमचं कान पिळावेत अशी अपेक्षा करतो, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड – https://t.co/4eNyQZXJLd @NANA_PATOLE
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर संजय राऊतांचा भाजपला चिमटा!- https://t.co/e0G2ULFPwe @rautsanjay61
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
प्रियांका गांधींचं मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र; म्हणतात…- https://t.co/2nk740mBe4 @priyankagandhi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019